शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (21:10 IST)

महिला गांजा माफीया शोभा डॉनच्या बांधल्या मुसक्या

धुळे पोलीसांच्या धडक कारावाईत महिला डॉन शोभा साळूंखेच्या ताब्यातून तब्बल सहा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. या महिला गांजा माफीयाला पोलीसांनी अटक केलीये. धुळे पोलीसांनी सध्या अमली पदार्थ्यांच्या अवैध व्यापारावर लक्ष केंद्रीत केलंय. नशा आणणाऱ्या पदार्थ्यांचा चोरटा व्यापार करणाऱ्या माफीयांच्या मुसक्या बांधल्या जात आहेत. याच मोहीमेत शहरातील शनिनगर भागात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत शोभा डॉन नामक महिला माफीयाकडून ५० ते ६० हजाराच्या रोख रकमेसह सहा लाखांचा गांजा जप्त केलाय.
 
धुळे शहर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोती नाल्यालगत असलेल्या शनिनगर परिसरात राहणाऱ्या शोभा साळुंखे उर्फ शोभा डॉनच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलीये.