रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (08:46 IST)

कुत्र्याने घेतला चावा, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेता राम कपूर यांची आई रिटा कपूर यांच्या पाळीव कुत्र्याने शेजाऱ्यांच्या मुलीचा चावा घेतल्या प्रकरणी रिटा कपूर यांच्याविरुद्ध मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मलबार हिल पोलिसांनी रिटा कपूर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
 
अभिनेते राम कपूर यांची आई रिटा कपूर दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथील एका सोसायटी मधील रो होऊनमध्ये राहण्यास आहेत. रिटा कपूर यांनी जर्मन शेफर्ड जातीचा श्वान पाळला आहे. २३ जून रोजी रिटा कपूर या आपल्या श्वानाला घेऊन सोसायटीच्या आवारात फिरत होत्या. त्या वेळी सोसायटीतील काही मुले त्या ठिकाणी खेळत असताना रिटा कपूर यांचा श्वान खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर धावून गेला आणि ५ वर्षांची मुलगी मायरा हिच्या डाव्या पायाला चावला. मुलीचा आरडाओरड ऐकून रिटा कपूर यांचा नोकर धावतच आला आणि त्याने श्वानापासून मायराची सुटका केली.जखमी मायराला तिच्या पालकांनी ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार करण्यात आले.