मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (16:28 IST)

राज्यात मान्सून दाखल, हवामान खात्याची माहिती

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सोलापूरच्या काही भागातही मान्सून धडकला आहे. शिवाय ठाणे आणि कोकणातही अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्यामुळं राज्यातील बहुतांश भागांमध्ये वरुणराजा दिमाखात हजेरी लावणार हे स्पष्ट होत आहे. पुढच्या ४८ तासांत मान्सून राज्यात आणखी पुढे सरकणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं बळीराजा आणि राज्यातील जनता मान्सूनच्या आगमनामुळं सुखावणार असंच म्हणावं लागेल. पुढच्या ४८ तासांत मान्सून राज्यात आणखी पुढे सरकणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.