शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (09:41 IST)

चक्री वादळ गेले आता आला जीवनदायी असा मान्सून

बंगालच्या उपसागरात उठलेले अम्फान आणि अरबी समुद्रात उठलेले निसर्ग; ही दोन वादळे मान्सूनच्या प्रवासात अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविली होत. तसे झाले नाही मात्र अम्फाननंतर निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला असून आता आपला मान्सून वेगाने पुढे प्रवास करत आहे. देशात प्रथम येणार मान्सून केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या दाखल होतो आहे. आता येथून पुढे वेगात प्रवास तो येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वेगाने दाखल होईल, अशी शक्यता वर्तविली गेली आहे  जात आहे.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मान्सून हा पुढे प्रवास करत मध्य अरबी समुद्र, संपुर्ण केरळ, कर्नाटकाचा काही भाग, कोमोरीनचा व नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात, मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल होणार आहे.  
 
मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भ येथे तुरळक मुसळधार पाऊस पडला आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ येथे बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. सोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे संपुर्ण भागात तर कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
 
महाराष्ट्र राज्यासाठी अंदाज पुढील प्रमाणे आहे.  : येत्या ६ते ८ जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
मुंबईसाठी अंदाज : ६ जून रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.