1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (07:37 IST)

घ्या आता, हवामान खात्याने वर्तवला वादळी वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये १६ एप्रिल ते २० एप्रिल या ५ दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे शहरी भागातल्या जनतेला थेट फटका बसणार नसला, तरी ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग मात्र हवालदील होऊ शकतो. यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढचे पाचही दिवस तर दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या भागांना २० एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.
 
१६ ते २० या कालावधीमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो. तर २० एप्रिल रोजी दक्षिण कोकणमधल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसोबतच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.१६ ते २० या कालावधीमध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो. तर २० एप्रिल रोजी दक्षिण कोकणमधल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसोबतच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.