मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 11 जून 2020 (11:05 IST)

आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे उपनगर आणि पालघरमध्ये आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
 
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. केरळमध्ये वेळेवर पोहोचलेला मान्सून चक्रीवादळामुळे कर्नाटकमध्येच अडला होता. आता मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सून येत्या 48-72 तासांत दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
 
दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होईल तसेच मुंबई- ठाण्यासह उपनगर आणि पालघरमध्ये 13 आणि 14 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.