1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (12:06 IST)

कानपूर पोलिसांवर भ्याड हल्ला: डीएसपीसह 8 पोलीस शहीद

8 UP Policemen Shot Dead
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. तसचे 6 पोलीस गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
गंभीर पोलिसकर्मचार्‍यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 
 
विकास दुबे नावाच्या व्यक्तीने साथीदारांसह पोलिसांच्या पथकावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटलं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
 
हत्या करण्यासाठी केलेल्या ह्ल्ल्यात सलग गोळीबार सुरू होता. गोळीबाराला पोलीस दलानं प्रत्युत्तर दिलं परंतू या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर 4 शिपायी जखमी आहेत. 7 ते 8 जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.