गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (12:30 IST)

कानपूर एन्काऊंटर कोण आहे विकास दुबे ?

मागील वेळेस ऑक्टोबर 2017 मध्ये एसटीएफने विकास दुबेला लखनौ येथून अटक केली होती. विकासने कानपूरमध्ये 2001 साली पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती. 2001 मध्ये विकास दुबे याने भाजप सरकारमधील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांना पोलीस स्टेशनमध्ये घेरलं आणि गोळ्या घालून ठार केलं. या हायप्रोफाईल हत्येनंतर तो शिवलीच्या डॉन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने कोर्टात आत्मसमर्पण केलं आणि काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला.
 
कानपूरच्या एका इतर हत्या प्रकरणात विकासला अटक करण्यात मदत करणाऱ्याला पोलिसांनी 25 हजारांच बक्षीस ठेवलं होतं. त्यावेळी तो लखनौच्या कृष्णानगर भागात आ‍पल्या आत्याच्या घरात लपून राहत होता. 
 
विकास माजी प्रधान व जिल्हा पंचायत सदस्य राहून चुकला आहे. चौबेपुर ठाणा क्षेत्रातील बिकरु रहिवासी विकास दुबेला पोलिस 2017 मध्ये शिवराजपूर ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्यासह इतर प्रकरणांसाठी देखील शोध घेत आहे.
 
माहितीनुसार त्याला लहानपणापासून गुन्हेगारीमध्ये नाव मोठं करायचं स्वप्न होतं. त्याची गँग तयार करवून तो चोरी, दरोडे, खून असे गुन्हा करू लागला. नंतर ‍त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. परंतू ते शक्य झाले नाही आणि त्याला अनेक वेळा अटक करण्यात आली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
 
त्याने अनेक निवडणुका आणि राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी संबंधातील अनेक नेत्यांसाठी मोठी कामं केली आहेत. त्याच्या विरोधात उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्यावर 52 हून अधिक खटले सुरू आहेत. 
 
आज घडलेल्या घटनेत कानपूर पोलिसांवर भ्याड हल्ला करत गोळीबार करण्यात आला ज्यात डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत.