सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (16:09 IST)

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

मुंबईत करोनाग्रस्तांची वाढ लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 
दरम्यान, यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गत सरकारनं मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसंच प्रामुख्यानं मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. 
 
तसंच यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.