1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (09:13 IST)

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करु नये, महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

Maharashtra Police warns of legal action for circulating photos of Sushant Singh Rajput's body
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भावानांचा पूर आला आहे पण अशात काही लोक त्याच्या मृतदेहाचे फोटो देखील व्हायरल करत आहे अशात सोशल नेटवर्किंगवर असे फोटो शेअर करु नयेत असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे. 
 
वयाच्या ३४ व्या वर्षी यशस्वी अभिनेत्याने असे पाऊल का उचलले यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सुशांतच्या घरातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. मात्र आता याच फोटोंवरुन महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने इशारा दिला आहे.
 
पोलिसांनी सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


पोलिसांनी स्पष्ट केले आहे की याआधी लोकांनी फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे. 
 
सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील तीन ट्विट करण्यात आले आहेत. 
 
महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये असं आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत असं पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.