1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (11:35 IST)

'... तर मी आत्महत्या करेन' अभिनेत्रीच्या पोस्टमुळे मनोरंजन विश्वात खळबळ

bhojpuri actress
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे (Sushant Singh Rajput) मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रश्नांवर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याच्या जाण्यामुळे त्याचे चाहते अजूनही धक्क्यातून सावरले नाही आहेत.
 
यादरम्यान आणि एका घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने ( Rani Chatterjee) फेसबुक आत्महत्या करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
 
अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर एका माणसासंबधित स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्याबरोबर तिने लिहिले आहे की, हा माणून तिला गेल्या अनेक काळापासून त्रास देत आहे. हा इसम तिला शिव्या देत असल्याचंंही तिने यावेळी नमूद केले आहे.
 
त्याचप्रमाणे अभद्र भाषा वापरत असल्याची तक्रार राणीने केली आहे. राणीने असे म्हटले आहे की, 'जेव्हा काही लोकं तिला या माणसाने लिहिलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवतात तेव्हा मला खूप दु:ख होते आणि त्यावेळी नैराश्य येते.' या इसमामुळे दीर्घकाळापासून आपण नैराश्याचा सामना करत असल्याचे राणीने म्हटले आहे.
 
राणीने  (Rani Chatterjee)या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून मदत मागितली आहे. 'मदत न मिळाल्यास मी आत्महत्या करेन कारण आता मी थकले आहे', अशा शब्दात राणीने फेसबुकवर तिची व्यथा मांडली आहे.
 
2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक ठरले आहे. आत्महत्या आणि मृत्यूंमुळे पुरते मनोरंजन विश्व हादरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर यांचा अकाली मृत्यू त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत, त्याची मॅनेजर आणि टिकटॉक स्टार सिया कक्कर यांच्या आत्महत्या- या साऱ्यामुळे इंडस्ट्रीने अनेक कलाकार गमावले आहेत. त्यामुळे राणी चटर्जीची ही पोस्ट खळबळ माजवणारी आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची काय प्रतिक्रिया येईल,  पाहणे महत्वाचे ठरेल.