शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (08:57 IST)

माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट उमेदवाराची सरकारी अधिकाऱ्या धमकी

मुंबई येथे एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी सरकारी अधिकाऱ्यावरच आपला जोर चालवला आहे. शर्मा यांनी  निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच तुला मी बघून घेतो धमकी वजा इशारा  दिली आहे. या गंभीर  प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार चंदनासार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर घडला आहे.
 
शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक मैदानात उतरवले असून, शर्मांनी हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात चांगलाच जोर लावला असे दिसून येते आहे. शर्मा यांनी  प्रचारादरम्यान ठाकूर गटात अनेकदा जोरदार वाद देखील समोर आले आहेत. मात्र, आता मतदान अधिकाऱ्यांशीही वाद केल्याने शर्मांवर अरेरावीचा आरोप समोर येतो आहे.
 
मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करणे, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे, शिवीगाळ आणि दमदाटी करणे असे गंभीर आरोप प्रदीप शर्मांवर असून, प्रकरणात त्यांच्यावर आयपीसी 186, 504, 506, लोकप्रतिनिधी कायदा कलम 131 (1)(2), 171 (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.