बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धक्कादायक मुख्यमंत्री यांना मंत्रालयात घुसून ठार मारू अशी धमकी

धक्कदायक प्रकार घडला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकाविल्याप्रकरणी नांदेडच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल गृहविभागाला ५ ऑक्टोबरला रोजी पत्र मिळाले होते. त्यांनी पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु. या धमकी नुसार मंत्रालयात घुसून ठार मारू, अशा आशयाचा धक्कादायक मजकूर पत्रात नमूद केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे नाव, मोबाईल क्रमांक पत्रात नमूद असून,  संतोष कदम असे त्याचे नाव असून तो नांदेडच्या विरोधी पक्षातील कार्यकर्ता आहे.
 
पत्रानुसार ’तुम्ही नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणले, आपण अनेक पक्ष फोडले आहे, हे काही मला पटलेले नाही. त्यामुळे सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदीची लाट आली आहे, त्यामुळे आमच्यासारख्या व्यापारी कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मी निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्या गावात जो कोणी तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरकेल तसेच भाजपाचा झेंडा हातात दिल्यास व ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून ठार मारू,’ अशा आशयाचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. त्यानुसार, फडणवीस यांच्या सुरक्षेतही अधिक वाढ करण्यात आली आहे.