गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (07:38 IST)

विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क न भरल्याने थांबविले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी पालकांकडून शैक्षणिक शुल्क वसूल न करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत मविप्र संस्थेच्या होरायझन अकॅडमीने शालेय शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 9) शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर शिक्षकांकडून भर दिला जात आहे. शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास सुरू आहेत.

तर शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे तास बंद करण्यात आले असून, याबाबत पालकांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही. शुल्क भरण्यासाठी वेळ देऊन टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्यासाठी परवानगी द्यावी, लायब्ररी, स्पोर्टस आणि संगणक फी माफ करावी. केवळ ट्यूशन फी घेण्यात यावी आदी मागण्या पालकांनी केल्या. शाळा प्रशासनाकडून पालकांसोबत कोणीही संवाद साधला नाही. उलट शिक्षकांनी अरेरावी केल्याचा आरोप पालकांनी केला आहेे.