गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (09:16 IST)

तीन महिन्यांत बेस्टला तब्बल १५० कोटींचा तोटा

BEST loses Rs 150 crore in three months
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं यामुळे गेले तीन महिने निरंतर वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्टला एप्रिल ते जून दरम्यान सुमारे १५० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही बेस्टची प्रवासी संख्या न वाढल्याने सध्या उत्पन्न कमी, खर्च जास्त अशी बेस्टची अवस्था आहे.
 
मार्च महिन्यापासून टाळेबंदीला सुरुवात झाली. टाळेबंदी आधी बेस्टला परिवहन सेवेतून दररोज १ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळत होते. खर्च साधारण तीन कोटी रुपयांपर्यंत होता. ८ जूनपासून बेस्टची नियमित धाव सुरू झाली असली तरी अजूनही बेस्टचे उत्पन्न एक कोटी रुपयांच्या पुढे गेलेले नाही. 
 
तीन महिन्यापूर्वी प्रत्येक किलोमीटरमागे ११५ रुपये खर्च बेस्टला होत होता. तर उत्पन्न ६० रुपयांपर्यंत होते. पण आता ते कमी झाले आहे. एप्रिल महिन्यात बेस्टला जेमतेम १० ते १५ लाख रुपये उत्पन्न मिळाले. मे महिन्यातही हीच परिस्थिती होती. त्यात जूनमध्ये थोडीफार वाढ झाली. ८ जुलैपर्यंत बेस्टची प्रवासी संख्या १०,०७, ७६० पर्यंत पोहोचली. दररोजचे उत्पन्नही ८९.५६ लाखांवर गेले. परंतु ते आधीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे बेस्टसमोर उत्पन्नवाढीचे मोठे आव्हान आहे.