पुण्यात हॉटेल्स बंदच राहणार
पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे येथे हॉटेल्स आणि लॉज बंदच राहणार असा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्यात बुधवारपासून 30 टक्के क्षमतेने हॉटेल्स आणि लॉज उघडण्याला परवानगी मिळाली आहे.
मात्र पुण्यातील हॉटेल व्यवसाय तुर्तास बंदच राहणार आहे. पुण्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच माजी महापौर आणि इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने धास्ती निर्माण झाली आहे. पुण्यात धोका जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे.