गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (12:43 IST)

मराठमोळ्या अभिनेत्रीचे डोहाळे जेवण

sarita saurabh
Instagram
 मुंबई: गेल्या काही महिन्यात मराठी मनोरंजन विश्वातील 'भागो मोहन प्यारे' या मराठी मालिकेतील अभिनेत्रीचेही नाव जोडले गेले आहे. या मालिकेतील अभिनेत्री सरिता मेहेंदळेने अलीकडेच ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. अभिनेत्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत.
 
 सरिताने तिचा नवरा सौरभ जोशीसोबतचे फोटो शेअर करत प्रेग्नन्सीची घोषणा केली.आई-बाबा होणार असल्याचा आनंद यावेळी सौरभ आणि सरिता यांच्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतो आहे. शिवाय अभिनेत्री या फोटोंमध्ये तिचा बेबी बम्पही फ्लाँट करतेय. तिने पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने हे डोहाळे जेवण केले. फुलांच्या दागिन्यांमध्ये सजलेली सरिता खूपच सुंदर दिसत होती. बाळाला भेटण्यासाठी ती सरिता आणि सौरभचे कुटुंबीयही फार उत्सुक आहेत.