1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Senior actor Upendra Limaye will host Crime Patrol Marathi

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये हे टेलिव्हिजन वर गुन्हेगारीवर आधारित मालिका क्राईम पेट्रोल मराठीचे सूत्रसंचालन करणार आहे. हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी पासून सोनी मराठी, सोनी लिव्ह वर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजे पासून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा उद्धेश्य गुन्हेगारीबद्दल जागरूकता निर्माण करणे, दक्षतेला प्रोत्साहन देणे आणि जबाबदारीचे महत्व पटवून देणे आहे. 
या मालिकेत वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेऊन अशा घटनांचा शोध घेतला जाईल जेणे करून धोका मिळण्याची चिन्हे ओळखून, संशयास्पद परिस्थितीवर प्रश्न विचारण्याची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा या साठी सावधगिरी बाळगण्याची माहिती मिळते. 
 
या मालिकेची टॅग लाईन "चुकीचे विचार काढून टाका आणि चांगले विचार व्हायरल करा, कारण आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!"
या कार्यक्रमाचे संचालन करण्याबाबत लिमये म्हणतात- एक अभिनेता म्हणून मी हे बघितलं आहे की , लोकांच्या मनावर कथा कसे परिणाम करू शकतात.
या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षक नक्की विचार करतील, सनी सतर्कता बाळगतील अशी आशा आहे.
या मालिकेच्या माध्यमातून समाजात जागरूकता आणि सकारात्मक विचार पसरवणे महत्त्वाचे आहे. कारण सुरक्षित समाज घडवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 
ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये हे हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील अष्टपैलू अभिनेता आहे. त्यांना २००९ साली जोगवा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी मराठीतील मुक्ता , बनगरवाडी , कैरी , सावरखेड: एक गाव , यलो , मुळशी पॅटर्न आणि संगीत मानापमान या चित्रपटात अभिनय साकारले आहे. तसेच हिंदीतील ॲनिमल' , 'चांदनी बार' , 'पेज ३' आणि 'ट्रॅफिक सिग्नल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे .
 
पुढील लेख
माधुरी दीक्षित समोर गौतमी पाटीलचं स्पष्ट वक्तव्य; “एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन पाहा, मग टीका करा!”