‘ढसाळ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली
ढसाळ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. नागपूर येथे आयोजित धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर हा टीझर अनावरण करण्यात आला. अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये त्यांचा दमदार आणि प्रभावी लूक दिसतो.
चित्रपटाबद्दल थोडक्यात
विद्रोही कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनप्रवासावर आधारित चरित्रपट आहे. यामध्ये मुख्य कलाकार ललित प्रभाकर यांनी नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स. निर्मिती वरुणा मदनलाल राणा व संजय पांडे यांनी केली आहे. व दिग्दर्शन व लेखन: वरुणा मदनलाल राणा यांनी केले असून चित्रपटाला संगीत इलायराजा यांनी दिले आहे. टीझर फक्त सुमारे ३६ सेकंदांचा आहे आणि त्यात दोन शक्तिशाली डायलॉग आहेत — “मी नामदेव ढसाळ.. आणि मी एक दलित”. प्रेक्षकांमध्ये या टीझरने उत्सुकता निर्माण केली आहे. प्रहारमधील अजमल कसाबच्या भूमिकेनंतर ललितची ही आणखी एक दमदार भूमिका ठरणार आहे.
विद्रोही कवी आणि दलित पँथर्सचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतिक्षित मराठी चरित्रपटाचा दमदार टीझर नुकताच नागपूर येथील धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसले चॉकलेट बॉय इमेज असलेला लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर यात नामदेव ढसाळ यांच्या मुख्य आणि तडफदार भूमिकेत दिसत आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या ४-५ वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर वरुणा मदनलाल राणा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 'दि बायोस्कोप फिल्म्स' आणि संजय पांडेय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एप्रिल २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

