शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (14:56 IST)

'शेर शिवराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

sher shivraj
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शिवराज अष्टक' या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन केलं असून आता या संकल्पनेतील पुढचा चित्रपट 'शेर शिवराज' येत्या 22 एप्रिल रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजखान स्वारीवर आधारित आहे.
 
या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'शेर शिवराज' चित्रपट दिगपाल लांजेकर यांनी लिहल असून या चित्रपटाचे दिगदर्शन सुद्धा त्यांनीच केल आहे. 
 
या चित्रपटामध्ये शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. या मराठी चित्रपटाचे निर्माते नितिन केणी , प्रद्योत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय डी मांडलेकर, नवीन चंद्र, मुंबई मूव्ही स्टुडिओ, राजवारसा प्रॉडक्शन, मूलाक्षर प्रॉडक्शन हे आहेत.