सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (08:53 IST)

सोनूने पहिल्यांदा गायिली एकाच सिनेमातील सर्व गाणी

गोड गळ्याचा गायक सोनू निगमने आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात हक्काचं घर केलं आहे. गेली कित्येक वर्षे सोनू निगमची गाणी संगीतप्रेमींना अक्षरशः वेड लावत आहेत. अमराठी गायक मराठी गाणी तितक्याच ठसक्यात कसा गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनू निगम. आतापर्यंत सोनू निगमने गायलेली सदाबहार गाणी तरुणाईलादेखील भुरळ पाडतात. असा गोड आवाज असलेला आणि तितकाच दिसायलाही गोड असणार्‍या सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. आणि ती गाणी एकापेक्षा एक हटके आणि रोमांटिक आहेत. सोनूचा आवाज किती गोड आणि रोमांटिक आहे हे आपण अनेक गाण्यांतून अनुभवलंय, पण जर 'आशिकी'सारख्या विषयावर आधारित सर्वच गाणी सोनू गाणार म्हणजे तरुण मंडळी पुन्हा एकदा सोनूवर फिदा होणार, हे नक्की. टी-सीरिजची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'अशी ही आशिकी' या सिनेमात सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत.