Dharma Sangrah
✕

Sunil Shende: ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन

Updated: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (16:53 IST)
 
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या आवडत्या कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अभिनेत्याच्या निधनाची माहिती शेअर करताना त्यांच्या जवळच्या मित्राने लिहिले की, "हिंदी आणि मराठीत अभिनय करणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील शिंदे यांचे आज निधन झाले. गांधी चित्रपटात छोटी भूमिका केल्यानंतर त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या. सर्कस (टीव्ही-डीडी) मधील बाबूजी (सर्कसचा मालक) या भूमिकेने ते प्रसिद्ध झाले .
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी कथुंग (1989), मधुचंद्राची रात (1989), जस बाप तसे पोर (1991), ईश्वर (1989), नरसिंहा (1991) याशिवाय सरफरोश, गांधी, वसावा या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

डिसेंबरमध्ये भारतात कुठे फिरावे? हवामान आणि प्रवासाच्या सोयीनुसार पर्याय

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुढील लेख
Show comments