मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (17:21 IST)

Takatak 2 :टकाटक 2 चित्रपटातलं ‘लगीन घाई’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

film Takatak 2
Takatak 2 :टकाटक 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं 'लगीन घाई' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सोशल मीडियावर प्रचंड गाजलं आहे. या गाण्यानं प्रदर्शित होतातच प्रेक्षकांचं मन वेधले आहे. 

टकाटक 2 हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट  2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचं मोशन, पोस्टर, टिझर आणि टायटल सॉंग प्रदर्शित झाल्यावर आता याच्या 'लगीनघाई ' हे गाणं  प्रदर्शित झाल्यावर या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ केला आहे. हे गाणं गीतकार जय अत्रे यांनी कथा आणि चित्रकथाला ओळखून लिहिलं आहे. या गाण्याला आनंद शिंदे आणि कविता राम यांनी आपला आवाज दिला आहे. संगीत बद्ध वरुण लिखते यांनी केलेलं हे गाणं प्रेक्षकांना आवडत आहे. या गाण्याबाबत आनंद शिंदे म्हणाले की, मिलिंद कवडे यांनी रसिकांची नाडी ओळखली आहे. त्यांना काय हवं ते त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं त्यांच्या चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. ‘लगीन घाई’ हे गाणं माझ्या शैलीतील असून ते माझ्या नेहमीच्या अंदाजात गायलं आहे.
लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक 2 या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.