सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (13:39 IST)

मालेगावमध्ये मनोरुग्णाने केले शहीद स्मारकाचे उदघाटन

shahid
मालेगाव शहरातील किदवाई रोडवर असलेल्या शहिदोकी यादगार म्हणून येथील चौकात स्मारक उभारले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामुळे या स्मारकाचे उदघाटन होऊ शकले नाही. त्यामुळे या स्मारकाला कपड्याने झाकून ठेवण्यात आले होते. मात्र एका मनोरुग्ण व्यक्तीने स्मारकावर चढत झाकलेला कपडा काढून टाकत चाबूतऱ्यासह या स्मारकावर साफ-सफाई केली. त्यानंतर त्याने पुष्पहार अर्पण केला. ही घटना घडत असताना अनेक जण थांबून सर्व प्रकार पहात होते. सध्या हा व्हिडीओ सोशल माध्यमातून बराच व्हायरल होत असून अनेकांनी राजकारणी लोकांना मनोरुग्णाने दिलेली ही चपराक असल्याच बोलले जात आहे.