मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (07:32 IST)

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आता हा अभिनेता

लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बहुप्रतीक्षित भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे आता समोर आले आहे.
 
मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.
 
प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे प्रविण तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती. तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. 
 
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता होती. हि भूमिका गश्मीर महाजनी साकारणार हे आता स्पष्ट झाले आहे. प्रविण तरडे यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या भूमिकेबाबतच्या सस्पेन्सवर पडदा टाकला आहे.
 
उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपट आहे. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्याबद्दलचे मोठे औत्सुक्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.