सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (11:00 IST)

'तुझ्यात जीव रंगला' ची प्रसिद्ध जोडी राणादा व अंजलीबाई अडकणार लग्नबंधनात

jujhat jiv rangala
‘तुझ्यात  जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतील अंजलीबाई आणि राणादा ची जोडी सर्वच प्रेक्षक वर्गाच्या मनात घर करून बसली होती. अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी हे खऱ्या-खुऱ्या आयुशातही लग्नबंधनात लवकरच अडकणार आहेत. येत्या ६ दिवसात अक्षया आणि हार्दिक आपल्या वैवाहिक जीवनात प्रवेश करणार आहेत.
 
पडद्या वरील रसिकांची आवडती जोडी म्हणजेच राणा दा व अंजली बाई आता आपल्या वैयक्तिक जीवनातही एकमेकांचे जीवनसाथी होणार आहे. अक्षया व हार्दिक यांनी 3 मे 2022 रोजी मोठ्या थाटा-माटात आपला साखरपुडा केला. साखरपुढ्यातील अक्षया व हार्दिकच्या लुक्सला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. आता लग्नातील पोशाख कसा असणार यावर सर्वच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मध्यंतरी त्यांचे केळवण व अक्षयची साडी विणतानाचे फोटो व्हायरल झाले होते.
हार्दिक व अक्षया यांचे लगीनघाई चे फोटोसुद्धा मध्यंतरी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. गेल्या काही दिवसा पूर्वी “मला नवरी झालेलं पाहायला तुम्ही सज्ज आहात का”अस म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर हार्दिक ने सुद्धा ‘घरच केळवण’ अस म्हणत एक पोस्ट टाकली होती. हार्दिकचा एक फोटो त्याच्या मैत्रिणीने इंस्टा स्टोरी ला टाकला होता त्यावर तिने “6 डेज टू गो” असा हॅशटॅग वापरला होता, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या लग्न सोहळ्याची मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे.
 
अक्षया व हार्दिक यांचा लग्न सोहळा येत्या १ किवा २ डिसेंबर ला पार पडणार आहे असा अंदाज लावला जात आहे. राणा दा व अंजली बाई आता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे सोबती होणार आहेत. या दोघांची जोडी पडद्या वरच नाही तर पडद्या आड सुद्धा प्रेक्षकांची आवडती आहे. त्यामुळे लग्नासाठी सगळेच खूप उत्साही आहेत. अगदी पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे व पुण्या मध्ये लग्न पार पडणार असल्याचे म्हंटले जात आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांची या सोहळ्यात उपस्थिती पहायला मिळणार आहे.

Edited By- Priya Dixit