शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (16:47 IST)

'व्हिक्टोरिया' चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Victoria marathi movie
बहुप्रतीक्षित 'व्हिक्टोरिया' चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. ट्रेलर बघून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा आणखीन वाढत आहे. प्रेक्षक सिनेमॅटोग्राफी, अभिनय आणि प्रॉडक्शनचे कौतुक करत याची तुलना हॉलिवूडशी देखील करत आहे.
 
मराठी चित्रपट अशा वेगळ्या विषय आणि धाटणीच्या विषयावर बघून प्रेक्षक आतुर आहे. निर्माता आनंद पंडित, रूपा पंडित तसेच वैशल शाह हे सह निर्माता आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. विराजस आणि जीत अशोक यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
 
या ट्रेलरमध्ये युकेमधील ‘व्हिक्टोरिया’ नावाचा एका आलिशान हॉटेल दाखवण्यात आले असून येथे एका स्त्रीचा मृत्यू झाल्याचे दर्शवले गेले आहे. सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे दोघे हॉटेलमध्ये जातात आणि मग सुरु होतो थरार... भूताचा हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटी येत आहे. सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि पुष्कर जोग या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 
 
चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.