‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला
बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल ठरत आहे. मुंबई, पुणे यांसह सर्वच शहरात हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही ब्रेक करताना दिसत आहे.
बाईपण भारी देवा या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला.
बाईपण भारी देवा या चित्रपटान प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात इतकी कमाई करणारा बाईपण भारी देवा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड या चित्रपटाने ५.७० कोटींची कमाई एका दिवसात केली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड सैराटच्या नावे होता. तर या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor