गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (14:36 IST)

माझी तुझी रेशीमगाठ सिझन 2 येणार?

majhi tujhi resham gath
Majhi Tujhi Reshimgath 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं प्रेक्षकांच्या हृद्यावर छाप सोडली होती. मालिकेतील कलाकार श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती मात्र काही कारणास्तव मालिकेनं लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आता माझी तुझी रेशीमगाठ सिझन 2 सुरू होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. श्रेयसने केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही मालिका बघायला मिळणार असे वाटत आहे. 
 
श्रेयसने एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, 'ती वेळ ज्याची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहत होतात. आमची ही रेशीमगाठ कधीही तुटायची नाही.' या व्हिडिओत तो 'माझी तुझी रेशीमगाठ' चे दिग्दर्शक अजय मयेकर यांना भेटला असून ते दोघे मिळून पुन्हा रेशीमगाठच्या दुसऱ्या सीझनबद्दल बोलत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर प्रार्थना बेहरे आणि स्वाती देवल यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे.
 
'माझी तुझी रेशीमगाठ' काही काळासाठी साडे सहा वाजता सुरू करण्यात आल्यामुळे लो टीआरपीमुले मालिका अखेर बंद करण्यात आली होती. मात्र आता श्रेयसच्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.
 
प्रार्थनाने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे की 'माझ्याही तारखा फ्री आहेत. मी तुम्हाला खूप मिस करतेय.' तर स्वातीने लिहिलं की 'हो माझ्याही तारखा आहेत. मी ही फ्री आहे. त्या दिवसांना मिस करतेय.'