सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2023 (12:03 IST)

प्राजक्ता माळीने घेतलं तिच्या स्वप्नातलं घर

prajakta mali
घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं.अभिनेत्री प्राजक्ता माळी ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अमिट छाप सोडली आहे. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. इंस्टाग्राम वर तिचे लाखो फॉलोअर्स आहे. तिने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने पुण्यात तिच्या स्वप्नांतलं घर घेतले आहे. 

प्राजक्ता आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पुण्यात घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली असून तिने घराच्या पाटीचा फोटो देखील शेअर केला आहे. या पाटीवर प्राजक्ता माळी असं लिहिले आहे. या पाटीवर तिच्या घराचा नंबर 1704 देखील दिला आहे. 

प्राजक्ता माळी हीचे स्वतःचे घर घेण्याचं स्वप्नं होत. ती घराच्या शोधात होती. घर घेण्यासाठी तिने बरीच प्रोजेक्ट पहिली. अखेर तिला पुण्याचे वातावरण आणि इमारतीचे बांधकाम आवडले आणि तिने पुण्यात घर खरेदी केले असून घराचा ताबा तिला दोन वर्षाने मिळणार आहे. 
 
प्राजक्ताने प्राजक्तराज पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड लॉन्च केला असून त्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. लोंकांनी तिच्या प्राजक्तराज दागिन्यांना पसंती दिली आहे. 
 
Edited by - Priya Dixit