शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (14:39 IST)

‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार

The successful run of the film 'Wade' begins
तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ चित्रपटाची यशस्वी घौडदोड सुरू आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा गाठणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी वाटचाल करत असताना रितेश देशमुखने चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.
 
‘वेड’ चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबाबत रितेशने इन्टाग्राम लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. याबरोबरच रितेशने चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 20 जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजेच चित्रपटातील एडिट केलेलं काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबरेबरच श्रावणी व सत्याचं एक रोमॅंटिक गाणंही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसंच चित्रपटाच्या शेवटी दिसणारं सलमान खान व रितेशचं गाणंही चित्रपटाच्या या नवीन व्हर्जनमध्ये दाखविण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटात हे बदल केलं असल्याचं, रितेशने सांगितलं आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor