शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (12:41 IST)

छोट्या पडद्यावरील या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

मराठी वाहिनीवरील दोन प्रचंड गाजलेल्या मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीय ' आणि स्टार प्रवाह वरील लोकप्रिय असलेली मालिका 'जय भवानी जय शिवाजी ' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे .जय भवानी जय शिवाजी मध्ये भूषण प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची  भूमिका साकारली आहे.  अवघ्या १५० भागातच ही मालिका संपत आहे. या मालिकेच्या जागी आता 'अबोली ' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .तर झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीय ' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकाच जागी देव माणूस 2ही मालिका प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे.