बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (12:40 IST)

Timepass 3 Movie Review : टाईमपास 3 मध्ये दगडू -प्राजूच्या प्रेमाला नवीन पालवी फुटणार

timepass 3
‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या  भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले.याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ?

आणि त्यानंतर दगडूच्या आयुष्यात काय बदल झाले हे सर्व सांगणारी गोष्ट टाईमपास 3 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत आहे. टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची प्रेमकथा बघायला मिळाली होती. याही भागात प्रेमकथा असणार आहेच पण यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे सध्याच्या तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे हिने. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. तिचा हाच डॅशिंग अवतार.चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. 
 
दगडूच्या आयुष्यातून प्राजु निघून गेल्यावर कॉलेजमध्ये तिची नव्याने झालेली एंट्री आणि दगडूच्या आयुष्यात झालेली एंट्री पूर्वीच्या लव्हस्टोरीसारखी नसून त्यात प्राजु एक सरळ भोळी मुलगी होती आता ती नव्या रूपात धडाकेबाज पालवी आहे. तर पालवीच्या पप्पा त्या भागातील मोठा डॉन दिनकर पाटील आहे. तर प्राजूचे बाबाना शाकाल दाखवले. या सिनेमात सर्वच कलाकारांनी आपलं काम उत्तम रित्या केले आहेत. संजय नार्वेकर, वैभव मांगल्ये, भाऊ कदम सारखे गुणी कलावंतांची साथ त्यांना लाभली आहे. तरी ही पहिल्या आणि दुसऱ्या भागासारखी गम्मत या 3 सऱ्या भागात पाहायला मिळत नाही. सिनेमाच्या रिव्ह्यू म्हणजे सिनेमाचा चांगला प्रभाव आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन भागात सिनेमा फिकट वाटतो. सिनेमाच्या शेवटी एक वेगळाच ट्विस्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवतो.टाईमपास 3 हा उत्कृष्ट कलाकारांच्या कामामुळे आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे आणि नवीन पात्रांमुळे प्रेक्षकांचा टाईमपास करणारा आहे. 'टाइमपास 3'  29 जुलैला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.