बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:54 IST)

Abhangwari- 'अभंगवारी'त रंगणार शास्त्रीय गाण्यांची मैफल

rahul deshpande
२०१८- २०१९ मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा 'अभंगवारी'ची संगीत मैफल रंगणार आहे. २३ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राहुल देशपांडे आपल्या सुरेल गायकीने अवघे सभागृह मंत्रमुग्ध करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनीस करणार असून  संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहून या 'अभंगवारी'ची शोभा वाढवणार आहेत.
 
नुकतीच भक्तीमय वातावरणात सर्वत्र आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. हेच भक्तिमय वातावरण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे खास या शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभंग, भक्तिगीते यांचा संगीत नजराणा श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुकमायशोवर तिकीटे उपलब्ध आहेत.