शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (21:53 IST)

गायक जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टनंतर गोळीबार, चार जण जखमी

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये गायक जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टनंतर एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या पार्टीबाहेर झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकारी लिझेथ लोमेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द नाइस गाय' रेस्टॉरंटच्या बाहेर ही घटना घडली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, रेस्टॉरंटच्या बाहेर गोळीबार झाला तेव्हा रॅपर कोडॅक ब्लॅक उर्फ ​​बिल कॅप्री लोकांच्या ग्रुपसह पोज देत होता.
 
जेफ बेझोस, त्याची मैत्रीण लॉरेन सांचेझ, अभिनेते अँथनी रामोस आणि टोनी गोन्झालेझ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचा समावेश होता. बीबर आणि त्याची पत्नी, हेली बाल्डविन, ड्रेक, ख्लो कार्दशियन आणि टोबे मॅग्वायर यांच्यासह मनोरंजन जगतातील अनेक सेलिब्रिटी पार्टीनंतर रेस्टॉरंटला जाताना  दिसले.