रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (09:11 IST)

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्यात कंगना राणौतने थिरकली

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन आज विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. विकी आणि अंकिताच्या लग्नाआधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री आहे. अभिनेत्री कंगना रणौत अंकिता आणि विकीच्या संगीतात पोहोचली होती.
 
एथनिक लूकमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती. अंकिताचा म्युझिक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कंगना आणि अंकिता एकत्र बसलेले दिसत आहेत. दोघांमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. कंगनाने अंकिताच्या संगीत समारंभात लहंगा घातला होता, तिने तिच्या आउटफिटसोबत भारी दागिने घातले होते. 
 
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने सोमवारी रात्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान, विकी आणि अंकितासोबत मस्ती करताना कंगनाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. 
 
कंगना रणौत आणि अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका' चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. चित्रपटाच्या सेटवरही दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनानेही अंकिताला उघडपणे पाठिंबा दिला होता.
 
या सोहळ्याचे फोटो शेअर करत कंगना रणौतने विकी आणि अंकिताचे लग्नासाठी अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या आनंदासाठी प्रार्थनाही केली आहे. यादरम्यान कंगना राणौतचा लूकही चर्चेत आहे. यावेळी कंगना राणौत हेवी ज्वेलरी परिधान करून पारंपरिक लूकमध्ये दिसली.