रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 13 डिसेंबर 2021 (22:03 IST)

करिना कपूरला कोरोनाची लागण, राहतं घर सील

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे राहतं घर सील करण्यात आलं आहे. दरम्यान आता करिनामुळे तिच्या कुटुंबियांपर्यंत कोरोना पोहचलेला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी आता छोटा नवाब म्हणजेच तैमूरची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. करिना कपूरसह अमृता अरोराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेकडून तिचं घर सील करण्यात आलं आहे.
बीएमसीच्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता आहे. दोघंही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसंच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.