1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (12:08 IST)

तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके अडकणार लग्नाच्या बेडीत

titiksha
Photo- Instagram
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अली कडेच शिवानी सुर्वे लग्न बंधनात अडकली. या पूर्वी अमृता देशमुख, स्वानंदी टिकेकर, मुग्धा -प्रथमेश लघाटे हे देखील वैवाहिक बंधनात अडकले. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे ही देखील सिद्धार्थ बोडकेशी लग्न करणार आहे. अभिनेत्रीने आपल्या केळवणाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने ह्याला त्याने मला डेटसाठी विचारलं आणि ते केळवणात रूपांतरित झालं असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्री सिद्धार्थसह तिचे फोटो शेअर करत असते. 
 
अभिनेत्री तितिक्षा आणि सिद्धार्थ हे दोघे तू अशी जवळी राहा या मालिकेत एकत्र दिसले होते. तितिक्षा सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे. सिद्धार्थ बोडके दृश्यम 2 या सिनेमात झळकला होता. त्याने मराठी तसेच हिंदी मध्ये ही काम केलं होत. 

 Edited by - Priya Dixit