शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (14:29 IST)

18 वर्षाच्या मुलाने केलं 35 वर्षाच्या महिलेशी लग्न

marrige
प्रेम हे रंग- रूप, जाती वय हे काहीच बघत नाही. प्रेम हे कोणत्याही वयावर अवलंबून नसते. प्रेमासाठी काही जण काहीही करायला तयार असतात. प्रेमात जोडपे लग्न करतात. पण हे लग्न जुळत नसेल तर त्याची चर्चा होते. असेच काहीसे घडले आहे भारताच्या शेजारच्या देशात पाकिस्तान येथे. 18 वर्षाच्या शेहजादला 35 वर्षाच्या कोमलशी प्रेम झालं. शेहजाद नावाचा हा तरुण कोमल नावाच्या महिलेच्या प्रेमात भारावून गेला की त्याने चक्क कोमलशी लग्न केले. 
या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असून हे लग्न केल्यामुळे तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. त्यांचा या लग्नासाठी विरोध होता.ही महिला शहजादच्या नात्यातली आहे. या लग्नासाठी दोघांना घरच्यांकडून विरोध पत्करावा लागला. त्याला मारहाण केली. तरीही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरविले आणि लग्न केलं. 
ते दोघे एकमेकांना एका विशिष्ट नावाने हाक मारतात. शहजाद कोमलला पिंकी नावाने हाक मारतो तर कोमल शहजादला मिठू नावाने हाक मारते. पाकिस्तानात पिंकी आणि मिठुच्या प्रेमाचे चर्चे होत आहे. या प्रेमकहाणीवर लोकांची प्रतिक्रिया येत आहे. 





Edited by - Priya Dixit