शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (17:34 IST)

नोट बंदीनंतरही ‘व्हेंटिलेटर’ ला सकारात्मक प्रतिसाद

ventilator marathi movie
देशामध्ये अनेक व्यवसाय आणि उद्योगांना नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. यात नाटक आणि सिनेमांनाही काही अपवाद नाहीत. मात्र यात ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला  प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या आठवड्यात जोरदार कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवला आहे. प्रेक्षक ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टीक मनी इत्यादी पर्यायांचा वापर तिकीट घेत आहेत.  प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे व्हेंटिलेटरने गेल्या 11 दिवसांत तब्बल 11 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.