“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर झाले प्रदर्शित
अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे प्रणव चोक्शी आणि डान्सिंग शिवा यांच्या सहकार्यातून प्रस्तुत करत आहेत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांची आहे. “वेळेचे पाऊल आणि ‘वविक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे.
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी आणि असेच अनेक गाजलेले मराठी चित्रपट तिच्या नावावर आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ संपूर्ण महाराष्ट्र ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
जीसिम्स विषयी–
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांच्या निर्मितीबरोबर त्यांनी भिकारी या चित्रपटाची प्रस्तुती केली होती. ‘जीसिम्स’ हा मराठीतील एक आघाडीचा स्टुडियो असून कंपनी चित्रपट, टीव्ही आणि वेबसिरीज तसेच टॅलेंट मॅनेजमेंट आणि सॅटॅलाइट ॲग्रीगेशन या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
‘डान्सिंग शिवा’विषयी-
अनुया चव्हाण कुडेचा आणि रितेश कुडेचा हे दोघे ‘डान्सिंग शिवा’चे भागीदार असून त्यांनी अलिकडे गाजलेला हिंदी चित्रपट ‘द ताश्कंद फाईल्स’ची सह-निर्मिती केली होती. त्यांनी ‘ऑल अबाऊट सेक्शन ३७७’ या सध्या ‘सोनी लिव’वर सुरू असलेल्या वेबसिरीजची यशस्वी निर्मिती केली आहे. त्याचबरोबर ‘वोह वाली पिक्चर’ या ‘झी5’वर लवकरच येणाऱ्या वेब सिरीजची निर्मिती त्यांनी केली आहे.
लोकी स्टुडिओविषयी-
सचिन मारुती लोखंडे आणि अतुल जनार्दन तारकर यांच्या नेतृत्वाखालील लोकी स्टुडिओने सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँड असोशिएशन, ब्रँडेड कॉन्टेट, चित्रपट निर्मिती, व्हिज्युअल प्रमोशन आदी अनेक क्षेत्रांत काम केले आहे.