testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘घेऊन जा गे मारबत’... ‘बकाल’ चित्रपटातील ‘मारबत’ वरील पहिले वहिले गाणे प्रकाशित

marbat
Last Modified गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (15:43 IST)
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला, होळी आदी सणांवरील पारंपारिक ठेक्यावरील अनेक गाणी चित्रपटांतून झळकली आणि अजरामर झाली. आजही ह्या सणांवरील गाणी आणि उत्सवाला अनुसरून अनेक चित्रपट येतात आणि ते कायम लक्षात राहतात. कारण, त्या त्या सणावेळी ती गाणी सर्वत्र वाजवली जातात. पण, विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजले जाणाऱ्या १३९ वर्षे जुन्या मारबत परंपरेवर एकही आरती अथवा गाणे प्रचलित नाही. चित्रपटांमधूनही त्याची दखल कधी घेतली गेली नाही. पण, समीर आठल्ये दिग्दर्शित आणि राजकुमार मेन्डा निर्मित आगामी ‘बकाल’ ह्या चित्रपटाने मारबत ह्या अनोख्या व जगाला अज्ञात असलेल्या धार्मिक आणि प्रचंड उर्जेने मोठ्या संख्येने साजरा होणाऱ्या उत्सवाची दखल घेतली आहे. चित्रपटात ‘घेऊन जा गे मारबत’ हे मारबत मिरवणुकीतील गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मारबत उत्सवाला वाहिलेले हे पहिले वहिले संगीतपुष्प असल्याने विदर्भातील ही प्राचीन परंपरा ह्या वर्षी अधिक उत्साहात साजरी होणार आहे. त्याचबरोबर जगाला मारबत परंपरेचे दर्शन घडणार आहे.
marbat
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी आणि गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने तान्हा पोळ्याला निघणाऱ्या काळी आणि पिवळी मारबत आणि बडगे मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत. काळ्या मारबतीला १३९ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३५ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी ही मिरवणूक तान्हा पोळ्याच्या दिवशी निघते.

मारबतीचा इतिहास
marbat
जसा लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकोप्यातून इंग्रजाविरूद्ध चळवळ उभी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तसेच ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त विदर्भातील जनतेने परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे.

पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३९ वर्षांपासून इतवारीस्थित नेहरू पुतळापासून काळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. प्रारंभी आप्पाजी मराठे काळी मारबतचा उत्सव साजरा करीत असत. स्वातंत्र्यापूर्वी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे. नेहरू पुतळ्याजवळील हनुमान मंदिरात ही काळी मारबत तयार करण्यात येते.
दरवर्षी भ्रष्टाचार, दहशतवाद, शहरातील समस्या किंवा अनैतिक प्रवृत्ती आदी विषयांवर बडगे काढले जातात. या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. विविध भागात बडगे आणि मारबती तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याची पुजा अर्चा आणि नवस केले जातात. नागपूरातील विविध भागातील मंडळांकडून बडग्यांच्या मूर्ती तयार केल्या जातात.
marbat
‘बकाल’ ह्या चित्रपटाची पार्श्वभूमी मारबत परंपरेच्या मूळ संकल्पनेशी जोडली आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे आणि प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी ही परंपरा आहे. ‘घेऊन जा गे मारबत’ ह्या गाण्याचे संगीत प्रकाशन महाराष्ट्राचे उर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, वनराई फाऊंडेशनचे श्री. गिरीश गांधी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल तसेच मारबत उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे संपन्न झाला.

‘घेऊन जा गे मारबत’ ह्या गीताचे बोल सुरेंद्र मसराम, संगीत मोरेश्वर -निस्ताने आणि स्वरसाज सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि धनश्री देशपांडे यांनी चढविला आहे. अलका कुबल, यतीन कारेकर आणि चैतन्य मेस्त्री आदी कलावंतानी मारबतच्या पहिल्या वहिल्या गाण्यात अभिनय केला आहे. धार्मिक बाजाचे देवीला आर्जव करणारे हे गीत विदर्भाच्या लोकसंगीत परंपरेला साजेसे व आबालवृद्धांना ठेका धरायला लावणारे आहे. सर्वांना हे मारबत विशेष गाणे ‘बकाल’ चित्रपटाच्या यृट्युब चॅनलवर तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम पेजेसवर पाहता तसेच डाऊनलोड करता येईल.
नागपूरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात रंगलेल्या ह्या संगीत प्रकाशन सोहळ्याला सिनेमाचे निर्माते राजकुमार मेंडा, दिग्दर्शक समीर आठल्ये, नवोदित कलाकार चैतन्य मेस्त्री, जुई बेंडखळे, कथाकार विनोद देशपांडे, नृत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्री-दीपा मेस्त्री, रूपाली कोंडेवार-मोरे, मालती दादलानी, शंकर धुरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
अभिनेता अंकुश चौधरी 'ट्रिपल सीट' घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या चित्रपटात अंकुश ...

... आणि 'गर्ल्स' सापडल्या

... आणि 'गर्ल्स' सापडल्या
'बॉईज'च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता 'गर्ल्स'च्या अनोख्या दुनियेची सफर ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया अशा दिसत होत्या
बॉलीवूडचा 'बादशहा' ​​शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan)ची मुलगी सुहाना ...