बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (13:44 IST)

नेहाची 'तिकीट टू फिनाले' मध्ये झेप

बिगबॉस मराठी सीजन २ च्या घरात १०० दिवसांचे कठोर आव्हान स्वीकारत 'तिकीट टू फिनाले' आपल्या खिशात घालत, अभिनेत्री नेहा शितोळे ने सर्वार्थाने बिगबॉस मराठी सीजन २ च्या विजेतेपदावर आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, तिला थेट अंतिम फेरीत पोहोचवण्याचे काम घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीच केले आहे ! या स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण १७ स्पर्धकांमधून, स्वतःला सिद्ध करताना नेहाला अनेक दिव्यातून सामोरे जावे लागले होते. विविध टास्क आणि समज - गैरसमजाच्या जाळ्यातून स्वतःला शिताफीने सोडवून घेत तिने आपल्यातली 'धाकड गर्ल' प्रेक्षकांसमोर आणली. तिच्या बिनधास्त आणि आग्रही स्वभावामुळे ती 'डॉमिनंट' असल्याचा आरोप तिच्यावर काही सदस्यांनी लावला होता. मात्र, याच सदस्यांनी पुढे जाऊन तिच्यातल्या खिलाडूवृत्तीचे आणि तिच्या स्वभाववैशिष्ट्याचे कौतुक देखील केले ! खेळादरम्यान आणि घरच्या कामात इंतरांसोबत अनेकदा खटके उडून देखील नेहाने कोणासोबत दुजाभाव केलेला आजतागायत दिसून आला नाही. विशेष म्हणजे तिच्यातली मैत्रीण लोकांना अधिकच भावली. मैत्रीच्या प्रेमापोटी अनेक मानअपमानदेखील तिने या घरात सहन केले असल्याचे दिसून आले. त्यामुळे, बाहेर परखड आणि कठोर वाटणारी नेहा आपल्या प्रियजणांसाठी खूप भाऊक आणि सोशिक होते हे देखील लोकांनी पाहिले.

विशेष म्हणजे तिच्या याच गुणांमुळे तिने घरातल्या प्रत्येक सदस्यांचे मन जिंकण्यात यश तर मिळवलेच, पण त्यासोबतच घराबाहेरील विरोधकांचे मतं देखील आपल्याबाजूने करण्यास तिला यश आले आहे. बिगबॉस स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात जाण्यासाठी नेहा ला मिळालेले 'तिकीट टू फिनाले' चे यश तिच्या या सर्वांगीण मेहनतीचे द्योतक आहे.