मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (15:52 IST)

'वीणा' च्या नाईट सुट्सची चर्चा

बिगबॉस मराठी सीजन २ च्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी स्पर्धक वीणा जगतापच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुश खबर आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या राधाच्या म्हणजेच वीणाच्या स्टायलिंगची सर्वत्र मोठ्याप्रमाणात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तिने बिगबॉसच्या घरात आतापर्यंत घातलेल्या प्रत्येक पेहरावाचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. खास करून ती घालत असलेल्या नाईट सूट्स ची क्रेझ यूथमध्ये वाढली आहे. तिचे नाईट सुट्स लोकांना आवडत असल्याचे मेसेजेस आणि कमेंट्स तिला येत आहेत. थोडक्यात काय तर, वीणाची वाढती प्रसिद्धी यांमधून दिसून येत आहे.
वीणाने यशस्वीरीत्या स्पर्धेच्या अंतिम दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून, ती घालत असलेल्या ज्वेलरी आणि कपड्यांची देखील चर्चा सोशल नेटवर्किंग साईटवर होत आहे. तिचे वाढते फॉलोअर्स आणि फेशनट्रेंड्स लक्षात घेता तिला अनेक ब्रॅण्ड आणि स्पॉन्सरदेखील चालून येत आहे. इतकेच नव्हे तर, तिने घातलेल्या कानातल्यांनादेखील आता स्पॉन्सर मिळू लागले आहेत.
 
अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतर वीणा जे काही घालते, त्याचे अनुकरण बाहेर त्वरित होताना दिसून येत आहे. मुळात, या विषयीच्या अपडेट्स स्वतः तिचे चाहते सोशल साईटवर देत असल्यामुळे, पुढे जाऊन वीणा एखाद्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर झाली तर काही वावगे ठरणार नाही !