सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (11:37 IST)

'भूल भुलैया'साठी चाहत्यांमध्ये वाद

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारच्या विनोदी 'भूल भूलय्या' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच अक्षय आणि कार्तिकच्या चाहत्यांमध्ये वाद रंगला आहे.
 
चित्रपटात अक्षयची जागा कोणी दुसरा अभिनेता घेवू शकत नसल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. मुख्य स्थानी असलेल्या कार्तिकचा 'भूल भुलैया' चित्रपट ३१ जुलै २०२० मध्ये रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. भूषण कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. 
 
चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून टीकेची झोड उठवण्यात आली. कार्तिक आर्यनला अशा भूमिका साजेशा नसल्याचे एका नेटकऱ्याने सांगितले आहे.