गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:24 IST)

जगातील 'मोस्ट हॅन्डसम' व्यक्ती 'हृतिक'

एका अमेरिकन एजेन्सीने, जगातील 'मोस्ट हॅन्डसम' व्यक्ती म्हणून हृतिकची निवड केली आहे. या 'मोस्ट हॅन्डसम' यादीमध्ये हृतिकने हॉलिवूड स्टार्स क्रिस इवांस, डेविड बेकहम, रॉबर्ट पॅटिनसन यांनाही मागे टाकलं आहे. ऑगस्ट २०१९ टॉप ५ मोस्ट 'हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड' या यादीमध्ये हृतिक पहिल्या स्थानी पोहचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड'साठी मतदान करण्यात आलं होतं. या मतदानानंतर हृतिकचं नाव टॉप ५ मध्ये पहिल्या नंबरवर आलं आहे.
 
येत्या २ ऑक्टोबरला हृतिक आगामी 'वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिकसह टायगर श्रॉफ आणि वाणी कपूरही स्क्रिन शेअर करणार आहे.