शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

...तर 10 ऑगस्टला पृथ्वीवर येऊ शकते भयानक आपत्ती, NASA ने शोधला पृथ्वीला टक्कर देणारा एस्टेरॉयड

अंतरीक्ष जग रहस्यमय आहे. अंतरीक्षात हजारोच्या संख्येत एस्टेरॉयड आहे. यातून काही लहान तर काही इतके मोठे आहेत की जर त्यांनी पृथ्वीला टक्कर दिली तर भयानक आपत्ती येऊ शकते. नासा सेंटर फॉर नीयर अर्थ आब्जेक्ट स्टडीजप्रमाणे 10 ऑगस्टला हे पृथ्वीच्या अत्यंत जवळ अर्थात 0.04977 एस्ट्रोनॉमिकल युनिट्स अंतरावरून पास होईल. याची पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता 7000 मधून एक अशी आहे. असे असले तरी वैज्ञानिक या धोक्याला कमी लेखत नाहीये.
 
अमेरिकी अंतरीक्ष एजेंसी नासा (NASA) ने 2006 क्यूक्यू 23 (2006 QQ23) नावाचं एक असं एस्टेरॉयड शोधलं आहे, ज्याची 10 ऑगस्ट रोजी पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता आहे.
 
वैज्ञानिक चिली स्थित जगातील सर्वात मोठी दुर्बिणद्वारे यावर नजर ठेवून आहेत. हे एस्टेरॉयड अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगहून अधिक विशाल असल्याचं सांगितलं जातं आहे. वैज्ञानिकांप्रमाणे धोक्याची चाहूल असल्यामुळे यावर सतत रिसर्च सुरू आहे. नासा नव्याने याचा आकार-प्रकार मापत आहे. हा 263 दिवसात सूर्याचा एक चक्कर लावत आहे.
 
वैज्ञानिकांनी 21 ऑगस्ट 2006 साली पहिल्यांदा हे एस्टेरॉयड शोधलं होतं, तेव्हा देखील याच्या टक्कर होण्याची भीती दर्शवली गेली होती. वैज्ञानिकांनी तेव्हा देखील सतत 10 दिवस यावर पाळत ठेवली होती. हा पृथ्वीच्या खूप जवळ आला असून नंतर गायब होऊन गेला होता. आता नासाच्या वैज्ञानिकांना हा एस्टेरॉयड पुन्हा दिसत आहे. 
(Symbolic photo)