मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (13:25 IST)

“सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये हिरोईचचा शोध सुरू

“सत्ते पे सत्ता’च्या रोहित शेट्टी आणि फराह खान यांच्या सिक्‍वेलसाठी आता कलाकारांची जुळवा जुळव वेगाने सुरू आहे. हृतिक रोशन या सिक्‍वेलचा मुख्य हिरो असणार आहे. आता त्याच्या 6 भावांची आणि त्यांच्या 6 हिरोईनची निवड करण्याचे काम जवळपास निश्‍चित व्हायला आले आहे.
 
सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या हिरोईनची नावे या चर्चेतून बाद करण्यात आली आहेत. कारण रोलमध्ये अपेक्षित असलेल्या हिरोईनपेक्षा सध्याच्या आघाडीच्या हिरोईन खूपच “तरुण’ आहेत. हेमा मालिनी यांनी साकारलेल्या रोलसाठी क्रिती सेनन, दीपिका पदुकोणपासून ते अगदी कतरिना कैफ पर्यंत बहुतेक सर्वच हिरोईनशी संपर्क साधण्यात आला असल्याची चर्चा होती. 
 
मात्र प्रत्यक्ष्यात यापैकी कोणाशीच आतपर्यंत संपर्क साधला गेलेला नाही. तर फराह खानच्या डायरेक्‍शनखाली काम करण्याची संधी मिळावी यासाठी काही हिरोईननी फिल्डींग लावायलाही सुरुवात केली आहे. पण त्यापैकी हृतिक रोशनबरोबर शोभून दिसणारी हिरोईन शोधायला लागणार आहे. हेमा मालिनींच्या रोलसाठी जरी कियारा आडवाणी, आलिया भट, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या प्रमुख हिरोईनना संधी मिळली नाही तरी 6 भावांच्या हिरोईनच्या रोलसाठी त्यांचा विचार होऊ शकतो.