शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (10:11 IST)

इन्स्टाग्रामवरून कमविण्यात प्रियांका चोप्रा पुढे

इन्स्टाग्राम अकाऊंटवर एखादी प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते. ‘हॉपरएचक्यू डॉट कॉम’ने ही ‘इन्स्टाग्राम श्रीमंतां’ची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये प्रियांका 19 व्या स्थानावर आहे. याबाबत तिने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यालाही मागे टाकले आहे. विराट या यादीत 23 व्या स्थानावर आहे. या यादीत स्थान मिळवणारे हे दोनच भारतीय आहेत. ‘देसी गर्ल’ प्रियांका अमेरिकेतील ‘क्‍वाँटिको’ मालिकेने व ‘बेवॉच’सारख्या हॉलीवूडपटामुळे आता आंतरराष्ट्रीय ख्यातीची अभिनेत्री बनलेली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 43.3 दशलक्ष म्हणजेच सुमारे 4 कोटी 30 लाख इतके फॉलोअर्स आहेत. विराटचे इन्स्टाग्रामवर 38.2 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत. तो एका प्रमोशनल पोस्टसाठी 1 कोटी 35 लाख रुपये घेतो. या यादीत अव्वल स्थानावर अमेरिकेतील टी.व्ही. स्टार आणि मॉडेल काइली जेनर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 141 दशलक्ष फॉलोअर्स असून ती एका प्रमोशनल पोस्टसाठी तब्बल 8 कोटी 70 लाख रुपये घेते!