रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 जुलै 2019 (09:59 IST)

अनुष्काने विराटशी लग्न केल्याचा केला खुलासा

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीचे अनेक चाहते आहेत. विराट आणि अनुष्का इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या विवाहाचे फोटो अनेक दिवस व्हायरल झाले होते. अनुष्का शर्माने विराटसोबत लग्न का केले? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या प्रश्नाचे उत्तर तिने स्वतः एका शोमध्ये दिले आहे.
 
अनुष्का म्हणाली कि, माझे विराटवर खूप प्रेम असल्याने त्याच्यासोबत लग्न केले. तसेच कोणच्याही विवाहित आयुष्य त्यांच्या करिअर आणि लोकप्रियतेवर कोणताही प्रभाव टाकत नाही. म्हणून मी विराट कोहलीशी लवकर लग्न केले.